परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचे पिंपरीत तीव्र पडसाद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ डिसेंबर २०२४ परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी
असणारी संविधानाची प्रतिकृती एका समाज कंठकनि तोडफोड करून विटंबना केली त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था संघटनांनी एकत्रित येवून झालेल्या विटंबनेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे जन आंदोलन केले.
परभणी येथील झालेली घटना अतिशय
निंदनिय असून ज्या नराधमाने हे कृत्य केले
त्या नराधमामागील सुत्रधार कोण आहे याचा
महाराष्ट्र शासनाने खुलासा करावा तसेच त्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी निषेध
नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन शिवशंकर उबाळे, हरिश डोळस, बी.बी. शिंदे, यूवराज दाखले, युवराज भास्कर, अशोक कदम, राहुल सोनवणे, धम्मराज साळवे, मारुती भापकर प्रतिभा बनसोडे, मेघा आठवले-धोत्रे, मनिषा घोडके राजू सरवदे, रुपेश शिंदे, नानाभाऊ डोळस, विजय ओव्हाळ, राजन नायर, भारत कुंभारे, रामभाऊ ठोके, बापु जगदाळे आदि प्रमुख उपस्थित होते.



