पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक
काल एसआरए बांद्रा कोर्टात संजय नगर पुनर्वसन प्रस्ताव विरोधात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी पार पडली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ ऑक्टोबर २०२५ काल एसआरए बांद्रा कोर्टात पिंपरी चिंचवड मधील संजय नगर पुनर्वसन प्रस्ताव विरोधात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी पार पडली. आपल्या दाव्याच्या बाजूने काही महत्त्वपूर्ण आदेश शिखर तक्रार निवारण समिती एस आर ए कडून देण्यात आले असून पुढील सुनावणी कामी व महत्त्वपूर्ण आदेश पारित करणे कामी एस आर ए पुणे यांना काही दस्ताऐवज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी सर्व नागरिकांना आजच्या सुनावणीच्या सविस्तर माहिती करिता कृती समितीने लवकरात लवकर संजय नगर मध्ये सभेचे आयोजन करावे. ही नम्र विनंती. यावेळी आजच्या सुनावणी कामी कृती समितीतर्फे माननीय मधुकर म्हस्के, विष्णू सातपुते, लालचंद पवार आणि ॲड. संतोष शिंदे हे उपस्थित होते.



