
प्रतिनिधी सतिश वि. पाटील मूंबई दि. २० सप्टेंबर २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी मोटार मालक कामगार वाहतूक सेल यांचे वतिने दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी ड्रायव्हर डे मुंबईत साजरा करण्यात आला.
“आपले खरे हिरो – ड्रायव्हरांच्या अखंड परिश्रमामुळेच शहर धावते, सेवा हीच आमची ओळख आहे.”
हा कार्यक्रम अजित दादा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, लतीफभाई तंबोली, सचिन जाधव (महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रवादी वाहतूक सेल), चिराग कटिरा (प्रदेश निरीक्षक), नवाब मलिक, संतोष धुवाली, सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी खलील भाई (मुंबई प्रदेश अध्यक्ष), सज्जाद अली (मुंबई कार्याध्यक्ष), सुखबिंदर सिंह (लाला भाई) (मुंबई कार्याध्यक्ष) शादाब मुजावर, जय हिन्द कुमार प्रजापति, जीशान खान, फैजान शेख, तबईन शेख, अज़हर अंसारी, मंसूर नाईक, खालिद शाह, गुलाम भाई, अर्सलान, महबूब खान, जुबेर मोमिन, शमशेर खान, राजन सिंह, जलाल खान, विजय कुमार, पप्पू खान, साजिद खान, मोजाम, फुरकान, अर्बाज खलील शेख, शोएब शेख, रऊफ भाई (हाजी मस्जिद), अनवर शेख (टोतो भाई) आणि आमची संपूर्ण टीम उपस्थित होते. ड्रायव्हर डेच्या निमित्ताने शहरातील सर्व रस्त्यांवर धावणाऱ्या ड्रायव्हर बांधवांना गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पाणी वाटप करण्यात आले.



