अपघातआरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मोरवाडी कोर्ट मागील भंगारमालाच्या गोदामाला लागली मोठी आग..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ फेब्रूवारी २०२४ पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुन्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटल्याचे सांगीतले जात आहे. टायर, केबलचा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागल्याचे दिसत आहे. सोबत ऑईलने भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून धुराचे लोट उठताना पहायला मिळताहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब आले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
ही घटना आज बुधवारी दि. २१ फेब्रूवारी २०२४ दुपारी १२:३० वाजन्याच्या सुमारास घडली. आसपासचे लोक सांगतात की हे सर्व बेकयदेशीर पणे प्लॅस्टिक, भंगार ऑईल साठा केला होता त्यालाच आग लागली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून या धुरामुळे अजमेरा कॉलनी म्हाडा कॉलनी तसेच मोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!