गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

खुन लपविण्याचा केलेला प्रयत्न वाकड पोलीसांमुळे ठरला अयशस्वी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ सप्टेंबर २०२३ थेरगाव परीसरातील इसम नामे दिनेश दशरथ कांबळे, वय २६ वर्षे, रा. एकता कॉलनी, थेरगाव, पुणे हा मागील ६
महिन्यांपासून मिसिंग असलेबाबत त्याची आई नामे माया दशरथ कांबळे, वय ५० वर्षे, रा. एकता कॉलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव,
पुणे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २६८ / २०२३ प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली.
एक तरुण ०६ महीन्यापुर्वी मिसींग झाला असुन त्याचे हरविले तारीख व पोलीस ठाणे मध्ये तक्रार दिलेली तारीख यामध्ये मोठी तफावत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील स.पो.नि. संतोष पाटील, पो.उप.नि. सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदारांसोबत मिसींग
व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसींगचा शोध घेत असताना मिसींग व्यक्तीचे आई वडील यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचा मुलगा दिनेश कांबळे हा कोणताही कामधंदा करीत नव्हता तसेच यापूर्वीही तो तीन ते चार वेळा १० ते १५ दिवसांकरीता त्याचे मित्र परीवाराकडे राहणेस जावुन परत आला होता. मात्र यावेळी त्याने घरातील त्याचे वडीलांची सोन्याची चैन न सांगता घेवुन गेला होता. त्यामुळे त्याचे आईने त्याचा जाब विचारला असता दोन दिवसांमध्ये चैन
परत आणतो असे सांगुन तो घरातुन निघुन गेला होता. तो अद्याप परत आला नाही.
मिसींग व्यक्तीचा शोध घेणेकामी ते रहात असलेले थेरगाव परीसरात बातमीदाराकडुन माहीती प्राप्त करुन मिसींग व्यक्ती
दिनेश कांबळे याचा मित्र ज्ञानेश्वर बिभीषण मोटे व श्रवण ज्ञानेश्वर मोटे दोघे रा. अशोका सोसायटी, रुम नं. २१, थेरगाव, पुणे यांचेकडे चौकशी केली असता माहीती मिळाली की, दि. १५ मार्च २०२३ रोजी रात्री ९:३० वा. चे सुमारास काळेवाडी फाटा
शेजारील ग्राऊंडवर दिनेश कांबळे हा त्याचे मित्र सिध्दांत रतन पाचपिंडे व प्रतिक रमेश सरवदे यांचेसह दारु प्यायला बसला होता
त्यावेळी त्यांचेमध्ये भांडण झाले असल्याची माहिती त्याला मिळाली होती. परंतु दिनेश सध्या कुठे आहे याबाबत त्याला माहीती नाही.
त्यामुळे इसम नामे १) सिध्दांत रतन पाचपिंडे, वय २३ वर्षे, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व २) प्रतिक रमेश
सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे यांना तांत्रीक तपासाद्वारे
ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, दि. १५ मार्च २०२३ रोजी रात्री दिनेश कांबळे हा त्यांचे सोबत
होता. त्या तिघांनी सुरवातीस पिंपरी मध्ये दारु पिली त्यानंतर ते तिघे ॲक्सेस मोपेड वरुन काळेवाडी फाटा येथे आले तेथे असणारे
मोकळे मैदानात पुन्हा दारु पिणेस बसले होते. त्यावेळी दिनेश कांबळे याने प्रतिक सरवदे याचे पत्नीबाबत अश्लिल भाषा वापरण्यास
सुरुवात केलेने त्यांचेत भांडण सुरु झाले. भांडणात प्रतिक रमेश सरवदे व सिध्दांत रतन पाचपिंडे यांनी दिनेश याचे डोक्यात
सिमेंटचा गट्टू मारुन त्यास जखमी केले व तेथुन निघुन गेले परंतु काही वेळाने ते दोघेही रात्री ११:०० वा. सुमारास पुन्हा माघारी आले व जखमी दिनेश यास ॲक्सेस मोपेडवर मध्ये बसवुन औंध नंतर दापोडी येथे घेवुन जावुन दि. १६ मार्च २०२३ रोजी ०२.१५ वा. सुमारास पुणे मुंबई रोडवर मेट्रो पोल नंबर एन.पी. ०९ चे जवळ, कासारवाडी, पुणे येथे नाशिक फाटा ब्रिज वरुन दिनेश कांबळे याला खाली
फेकुन देवुन त्याचा खुन केला असे सांगीतले. दिनेश कांबळे यास ब्रिजवरुन खाली फेकुन दिल्याने तो जागीच मयत झाला. दिनेश कांबळे हा जुना पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत मिळुन आला परंतु त्याचे अंगावर त्याची ओळख पटविणेबाबतचा कोणताच पुरावा नसल्याने बेवारस व्यक्तीचा अपघात बाबत भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०४ (अ), २७९, १८४,१३२(१)(सी), १९९, १७७, १३४ (ए), १३४ (बी) प्रमाणे दि. १६ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आला आहे.
त्यामुळे १) सिध्दांत रतन पाचपिंडे, वय २३ वर्षे, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व २) प्रतिक रमेश
सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे यांना ताब्यात घेवून भोसरी
पोलीस स्टेशनचे गुन्हया मध्ये मनुष्य वधाचा प्रकार असल्याचे व आरोपी निष्पन्न झालेबाबत रिपोर्ट सादर करुन आरोपी ताब्यात देणेत
आले आहेत. सदरबाबत पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशन करीत आहे. वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व
अंमलदार यांनी मिसिंग तक्रार दाखल झाल्यापासून दिवस-रात्र अथक परिश्रम करुन ३६ तासात सदर प्रकरणाचा उलघडा केला
आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री. डॉ. संजय शिंदे सह.पोलीस
आयुक्त, श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. गणेश
जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. संतोष पाटील, पो.उप.नि. सचिन चव्हाण,
स.पो.फौ. बाबाजान इनामदार, स.पो.फौ. राजेंद्र काळे, पो.हवा. बंदु गिरे, पो.हवा. संदीप गवारी, पो.हवा. स्वप्निल खेतले, पो.हवा. दिपक साबळे,
पो.हवा. अतिश जाधव, पो.हवा. प्रमोद कदम, पो.ना. प्रशांत गिलबीले, पो.ना. अतिक शेख, पो.ना. विक्रांत चव्हाण, पो.ना. राम तळपे,
पो.शि. अजय फल्ले, पो.शि. भास्कर भारती, पो.शि. स्वप्निल लोखंडे, पो.शि. सौदागर लामतुरे, पो.शि. कौंतेय खराडे, पो.शि. रमेश खेडकर, पो.शि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!