सेक्टर क्र. २२ निगडी, संजयनगर संदर्भातील एस.आर.ए. पूण्यात दि.३० जून २०२५ रोजीची सुनावणी संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ जूलै २०२५ काल दिनांक ३० जून २०२५ एस. आर. ए. पुणे यांच्या कार्यालयात संजय नगर, पुनर्वसन प्रकल्पाबाबत १५६३ बैठी घरे सेक्टर क्र.२२ कृती समितीने दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावनी मध्ये – माननीय सीईओ – गटने साहेब व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये आणि कृती समिती पदाधिकारी व संजय नगर मधील हरकत धारक रहिवाश्यांच्या उपस्थिती मध्ये दाखल हरकती वर दुबार पुनर्वसना विरोधात ॲडवोकेट संतोष शिंदे यांचे वतीने कृती समितीची बाजू सर्व पुराव्याणीशी भक्कमपणे मांडण्यात आली. निगडी सेक्टर क्र. २२ मधील १५६३ बैठी घरांचे ०१ मे २०२५ रोजी मनपातर्फे मुळात पूनर्वसन झाले असताना देखील बिल्डर लॉबीच्या फायद्याकरिता खोटी ०३ क ऑर्डर व खोटे सर्वेक्षण व लोकांना चुकीची माहिती देऊन, दिशाभूल करून त्यांच्याकडून लाभार्थी फॉर्म भरून घेतले. व अनधिकृत दुबार पुनर्वसन प्रकल्प मंजूर करून घेतला. आजच्या सुनावणी मध्ये दाखल हरकती वर दुबार पुनर्वसना विरोधात ॲडवोकेट संतोष शिंदे यांचे वतीने कृती समितीची बाजू सर्व पुराव्याणीशी भक्कमपणे मांडण्यात आली. व दुबार पुनर्वसनास सर्व जनतेचा व लाभार्थी म्हणून ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा देखील विरोध असल्याचे SRA सुनावणी समितीस सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने संजय नगर मधील रहिवाशी व कृती समिती पदाधिकारी – प्रशांत नाटेकर, शिवाजी साळवे, ॲड. संतोष शिंदे, सुलतान तांबोळी, बसवराज नाटेकर, प्रमोद क्षीरसागर, अक्षय करांडे, सचिन उदागे, रमेश शिंदे, सुधाकर म्हस्के, अरुण जोगदंड, सनमुख हादिमणी, रवी पाटोळे, विकास गालफाडे, जावळे, शुभम शिंदे, बुध्दभूषण अहिरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



