फसवणूकमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्याकडे किती आहे संपत्ती?

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. २३ मार्च २०२६ या मालमत्तेची चौकशी आजपर्यंत का झाली नाही असा प्रश्न जनतेला व विरोधकांना पडला आहे. सर्व राजकारणी का म्हणून या भोंदू बाबाच्या नादी लागले आज जग चंद्रावर पोहचले विज्ञान युगात हा अज्ञानी बाबा कसा भरभराटीला आला, नावारूपाला आला याला राजकीय वरहस्त मिळत होता आजपर्यंत हेच त्रिवार सत्य आहे.
भोंदूबाबा  अशोक खरातकडे अंदाजे ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ३० हून अधिक ठिकाणी जमीन, आलिशान बंगले आणि फार्महाऊस खरेदी केले आहेत, ज्यात पाथर्डीतील ३० एकर जमीन, गौळाणे आणि मिरगाव येथील मालमत्तेचा समावेश आहे, तसेच ही मालमत्ता त्याच्या आणि नातेवाईकांच्या नावावर आहे.
अशोक खरातच्या संपत्तीचे तपशील:
एकूण मालमत्ता: अंदाजे ₹५०० कोटी.
जमिनी: पाथर्डी (अहिल्यानगर) मध्ये ३० एकर (अंदाजे ₹१५० कोटी), मिरगाव आणि कहांडळवाडी परिसरात ४५ एकर जमीन.
इतर मालमत्ता: गौळाणे शिवारात जमीन (₹३० कोटी), मिरगाव येथील फार्म हाऊस (₹१३ कोटी), आणि कर्मयोगीनगर येथील आलिशान बंगला व कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय (₹२०० कोटींच्या घरात).
कशी जमवली संपत्ती?:
भोंदूगिरी आणि लोकांच्या जमिनी बळकावून ही कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.
या मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
बाबा अशोक खरातच्या इतर मालमत्तांबद्दल चौकशी व कारवाई होणार का की क्लीनचीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आजचा सवाल
यात एक वाटते कदाचित उप मुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या घात की अपघात यावर चर्चा थांबवण्याकरिता हा भोंदूबाबाचा विषय घाई घाईत काढला जातोय का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!