अपघातमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

काल सकाळी डोंबिवली स्थानकात लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरुन घसरला..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २१ एप्रिल २०२६ काल डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
डोंबिवली स्थानकात रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले असून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलवरही टांगती तलवार मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काल सोमवारी विस्कळीत झाली. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
रविवारी ही फलाट बंद होते
कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिल्याच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थानकातून मार्गस्थ होत असतानाच घसरली. यामुळे डोंबिवली पुढील प्रवासाचा खोळंबा झाला. या लोकलच्या मागे असलेल्या डोंबिवली ते दिवा दरम्यानच्या चार लोकल डोंबिवली स्थानकातून पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्या असून काल तासभरापासून लोकल सेवा ठप्प होती.
कोपर, ठाकुर्लीला एकही ट्रेन थांबणार नाही
मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी सकाळी ८.३० वाजताची लोकलचे दोन डबे डोंबिवली स्थानकात घसरले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून कल्याण कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान पुढील काही काळ एकही लोकल थांबणार नसून प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा, कल्याण ते दिवा दरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली जात होती. या अशा घटना वारंवार का घडत आहे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहेत का? अत्यानुधिक युगातही असा भोंगळ कारभार कसा काय चालतो असे काल पासून प्रवाशी सरकारला विचारणा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!