गून्हापिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रशहरसामाजिक

काळेवाडीतील बाल अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी-सायली नढे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२१ एप्रिल २०२६ काळेवाडीतील अडीच वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत सायली नढे यांनी मुख्यमंत्री आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडीत १३ एप्रिल २०२६ रोजी ४७ वर्षीय विजय भोसले याने शेजारच्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही अतिशय दुर्दैवी आणि हादरवणारी घटना आहे. खेळण्याबागड्यातील वयाच्या चिमुकल्या मुलींसुद्धा आता सुरक्षित राहिल्या नाहीत. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. फाशीची शिक्षा देऊन इतरांना धडा शिकवला गेला पाहिजे. असे मत यावेळी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी व्यक्त केले.
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की या खटल्याला फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टात तातडीने हस्तांतरित करण्यात यावे आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित मुलीला तातडीने न्याय, आर्थिक, मानसिक व वैद्यकीय मदत देण्यात यावी.
परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस पेट्रोलिंग व सीसीटीव्ही व्यवस्था वाढवण्यात यावी. असे निवेदनात नमुद केले आहे.
या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिला काँग्रेसकडूनही या प्रकरणात कठोर कारवाईसाठी सतत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सायली नढे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!