सांगवी-बोपोडी पुल सुशोभीकरणामध्ये झालेल्या १२ कोटींच्या अतिरिक्त खर्चाबाबत तीव्र निषेध व चौकशीची मागणी.

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २१ एप्रिल २०२६ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सांगवी व बोपोडी यांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाच्या सुशोभीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३२ कोटी २६ लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रत्यक्षात सुशोभीकरणासाठी २० कोटी १४ लाख इतकाच खर्च झाला असून, उर्वरित १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा विनियोग संशयास्पद आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना व शहरातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना केवळ एका पुलाच्या सुशोभीकरणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करणे म्हणजे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया, कामाचे स्वरूप व झालेला खर्च याबाबत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप होत आहे.
आमच्या प्रमुख मागण्या:
१) सदर प्रकल्पाच्या संपूर्ण खर्चाचे श्वेतपत्रिका जाहीर करावी.
२) ३२ कोटी २६ लाख मंजूर खर्च व २० कोटी १४ लाख प्रत्यक्ष खर्च यातील १२ कोटींच्या तफावतीची सखोल चौकशी करावी.
३) या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी.
४) भविष्यात अशा प्रकारची उधळपट्टी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
सदरील प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची प्रतिमा नेहमी प्रमाणे पून्हा एकदा मलीन झाली असून, पिंपरी-चिंचवडमधील करदात्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन ७ दिवसांच्या आत खुलासा करावा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे कळवीले आहे.
सांगवी बोपोडी पूल सुशोभीकरण व मागिल प्रकरणात या दोन्ही विषयांमध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची अतिशय बदनाम होत असून या प्रकारांची सखोल चौकशी करून अहवाल जनतेसमोर सादर करावा.
यावेळी सचिन चिखले- मनसे शहराध्यक्ष, बाळा दानवले – उपाध्यक्ष, रुपेश पटेकर – सचिव, मयुर चिंचवडे – विभागीय अध्यक्ष, विक्रम भोसले – उपविभाग अध्यक्ष, आकाश सगरे – संघटक पि. चि. उपस्थित होते.



