अवैधआरोग्यपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागात ‘रामभरोसे’ कारभार; डॉक्टर झोपतात, तर कर्मचारी मद्यपान करतात

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी आयुक्तांकडे केली गंभीर तक्रार; चौकशी व कठोर कारवाईची केली मागणी..


प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जून २०२६ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय त्रुटी आणि कर्मचाऱ्यांचा गैरकारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानधनावरील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करून घेणे, ड्युटीवर असताना डॉक्टरांचे झोपणे आणि काही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडून चक्क मद्यपान करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली किरण नढे यांनी केला आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

​सायली नढे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये वैद्यकीय विभागातील धक्कादायक वास्तव मांडले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयातील अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक कामे, जसे की रुग्णांना टाके घालणे आणि टाके काढणे, ही कामे थेट ‘मानधनावरील ब्रदर’कडून करून घेतली जात आहेत. हे अत्यंत बेकायदेशीर आणि धोकादायक आहे.
रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडून केबिनमध्ये झोपून राहतात, त्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
दुपारी साडेबारा वाजता केसपेपर खिडकी बंद झाल्यानंतर काही कायमस्वरूपी कर्मचारी मद्यपान करून झोपलेले असतात. तसेच, कामाच्या वेळेत गुंड प्रवृत्तीचे मित्र बोलावून मस्ती करणे, गुटखा-तंबाखू खाणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत.
अनेक कायमस्वरूपी कर्मचारी केवळ उपस्थितीची नोंद करून वैयक्तिक कामासाठी बाहेर जातात आणि आपली कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपवतात. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रॅगिंग आणि मानसिक पिळवणूक केली जाते. यावेळी ॲड. उमेश खंदारे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, स्वाती शिंदे, प्रियंका सकट, आशा भोसले,ॲड प्रियंका ढगे, प्रज्ञा जगताप उपस्थित होते
​कारवाईची मागणी :
​वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचारी कर्तव्यात कसूर करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या गैरप्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, तसेच एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी मागणी सायली नढे यांनी केली आहे. तसेच बायोमेट्रिक आणि आकस्मिक तपासणीद्वारे कर्मचाऱ्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!