Uncategorizedदेश-विदेश

प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या “RRR” चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर

प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या “RRR” चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाला. राजामौली यांच्या “RRR” चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले. जेव्हा सुरुवातीला या गाण्याला नॉमिनेशन मिळाले तेव्हांपासून भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाला उधाण आले होते. काही झालं तरी यंदा आपल्याला ऑस्कर हुलकावणी देवू नये, याची काळजी राजामौलींनी घेतली होती.
भारतीय चित्रपट विश्वाला तब्बल १४ वर्षांनी ऑस्कर मिळाला. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व तितकेच मोठे आहे. यापूर्वी ए. आर. रहमान यांच्या जय हो या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्या सोहळ्यामध्ये ए.आर. रहमान यांना देखील लाईव्ह परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा तर रहमान यांच्या सादरीकरणानं सर्वांची मने जिंकून घेतले होती. आता राजामौली यांच्या “RRR” चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचे सादरीकरण ऑस्करच्या मंचावर करण्यात आले.
एवढ्या मोठ्या कालावधी नंतर मिळालेल्या ऑस्करचा आनंद वेगळाच. त्यामुळे त्यांचे सेलिब्रेशनही तितक्याच उत्साहानं होताना दिसले. सोशल मीडियावर तर मीम्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे. खासकरुन एनटीआर, रामचरण यांच्या नाटू नाटू गाण्याचे रिल्स पुन्हा एकदा व्हायरल झाले. गेल्या काही महिन्यांपासून नाटू नाटूच्या ऑस्कर विषयी चर्चा सुरु होती.
याच प्रमाणे तब्बल १४ वर्षांन पूर्वी ए.आर. रहमान यांनी रचला होता इतिहास…
रहमान यांनी २००९ मध्ये समस्त भारतीयांना मोठा आनंद दिला होता. स्लमडॉग मिलेनियरला दिलेल्या संगीतासाठी त्यांना ऑस्करनं गौरविण्यात आले होते. यामध्ये बेस्ट ओरिजनल साँगसाठी गुलजार, बेस्ट ओरिजनल साँग स्कोअर साठी ए. आर. रहमान तर बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसुल पोकुट्टी यांना ऑस्करनं गौरविण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!