
इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर..
प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर पुणे जिल्हा अध्यक्ष बबनराव धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी निलेश गायकवाड उपाध्यक्षपदी संजय वायसे, सचिवपदी अभिजीत देशपांडे, खजिनदारपदी संजय शिंदे, प्रसिद्धी प्रमुखपदी महेश कळसाईत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्तात्रय पारेकर, भिमसेन उबाळे, संतोष तावरे, संतोष कदम, अरुण भोई, प्रविण पिसे, अंकुश भोसले, महेश गडदे, सीताराम मदने आणि प्रवीण वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना वाचा फोडण्याबरोबरच पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पत्रकार सेवा संघाच्या इंदापूर तालुका कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



