आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणार्‍या सात अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ९ नोव्हेंबर २०२३ शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत सात अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत करण्यात आले.

या उद्घाटनाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हवेची गुणवत्ता सुधारणे, संरक्षण, पुरवठा आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन उपाय यासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शुद्ध हवा अभियान अंतर्गत शहर कार्य आराखड्यास (सिटी ॲक्शन प्लॅन) केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याकरिता शहरातील रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करणेत येणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धुलीकणांचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच शहरातील मुख्य चौकांचे हवा प्रदुषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली ५ नवीन वाहनांवर बसविणेत आली आहे. अशी एकुण सात वाहने ताफ्यात दाखल झाली आहेत.सदरची यंत्रणा कार्यान्वित झाल्यास यंत्रणा बसविलेच्या परिसरातील पीएम-१०, पीएम-२.५, एसओएक्स, एनओएक्स इत्यादी वायु प्रदुषकांची पातळी मर्यादित राहणार आहे अशी माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
02:11