महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी,अधिकारी- कर्मचा-यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपध..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप या॔च्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,मुख्य लिपिक वसिम कुरेशी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान अशोक कांदे, सोमनाथ ढवळे, राहुल पुजारी, विद्युत विभागातील प्रशांत जोशी, संजय जरे,चेतन वाकडे,मधुकर कारंडे उद्यान विभागातील मंगेश टिळेकर,संजय शिंदे उपस्थित होते.
या वेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांनी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत “देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी आम्ही निष्ठापूर्वक काम करू तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गा-हाणी हिंसाचाराचा अवलंब न करता शांततामयी आणि संविधानिक मार्गाने सोडवू “ असा निर्धार करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली,शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा १९ नोव्हेंबर हा जन्म दिवस सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो व त्यादिवशी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!