आंदोलनआर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

रमाई आवास योजनेचे सर्व पेपर झाले आयूक्तांना सादर.. पण सहाय्यक आयूक्त दाखवतात पात्र लोकांना भूल थापेचे गाजर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० नोव्हेंबर २०२३ माता रमाई आवास घरकुल योजना बालाजीनगर, भोसरी येथील या योजनेचे पात्र लाभार्थी जे आहेत, त्यांना घरकुला साठी शासनाचे अनुदान मिळावे म्हणून, प्रा. बी. बी. शिंदे यांनी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेली पाच वर्षां पासून सततचा लढा लढत आहेत, वेळोवेळी आंदोलन व पत्रव्यवहार करत आहेत परंतू प्रशासन आज पर्यंत काहीना काही त्रुटी काढून महानगरपालिका आयुक्त यांचे कडून अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पण दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी शासनाच्या समाज कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून या सामाजिक संघटनेने आयुक्तांच्या नावे पात्र लाभार्थ्यास अनुदान देण्यात यावे असा आदेश, लेखी पत्र आणून आयुक्तास समक्ष भेटून दिले आहे. तरीही अतिरिक्त आयूक्त उल्हास जगताप व दूसरे अतिरिक्त आयूक्त आण्णा बोदडे हे दोन अतिरिक्त आयूक्त सतत टाळाटाळच करत आहेत.
सोबत कमिशन पोटी १५% मागीतले जातात असे प्रा. बी. बी. शिंदे यांनी सांगीतले या वेळी यूवराज दाखले यांनी दोन्ही आयूक्तांना जर (या गरीब झोपडी धारकांची) आमची मागनी कळत नसेल तर आशा आयूक्तांना मी साडी चोळीचा आहेर देणार. तसेच कमिशन पोटी जे १५%ची मागनी केली गेली आहे ती मागनी मी व माझे सहकारी पिंपरी चिंचवड मधून भिख मागून पूर्ण करून देतो असे यावेळी यूवराज दाखले बोलले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वरिष्ठ कोर कमीटी सदस्य देवेंद्र तायडे यांनी अतिरिक्त आयूक्तांना विचारले जर समाज कल्यांणचे सर्वच पत्र बरोबर आहेत तर पाच वर्ष या योजनेला विलंब का लागतो आहे याचे स्पष्टीकरण द्या असा प्रश्न उभा केला यावर अतिरिक्त आयूक्त आण्णा बोदडे यांनी उदया सविस्तर माहिती घेवून लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेवू असे सांगीतले. यावेळी राजन नायर यांनी फोन करून या अमरण उपोषणास माझा पाठींबा आहे असे सांगीतले व उदया पासून मी “भिमसृष्टी येथे उपस्थित असेल असे ही सांगीतले. आज ते जबलपूर येथून निघाल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी प्रा. बी. बी. शिंदे, देवेंद्र तायडे, यूवराज दाखले, अतिरिक्त आयूक्त आण्णा बोदडे, प्रा. बी. बी. शिंदे यांचे उपोषणकर्त्ये सहकारी लक्ष्मण सिरसट, दिलीप बनसोडे, सौ .सुनिता कांबळे, सौ .शालन ओव्हाळ तसेच पाठींबा देण्यास आलेल्या सामाजीक संघटनेचे पदाधीकारी नारायण मस्के, रामभाऊ ओव्हाळ, तुकाराम गव्हाणे, पंजाबराव कटके, वैजनाथ येडे, गिताराम वाघमारे, अंतीकाताई जावळे, राजु गायकवाड, संजय ओव्हाळ, लक्ष्मीबाई गुंजाळ, मोहनराव मस्के संस्थापक / अध्यक्ष बहुजन भिमसेना, महादेवी सिद्धार्थ गोजे महीला आघाडी बहुजन भिमसेना पुणे जिल्हाध्यक्ष, कपुर दलाराम देवासी, सिमा सुनिल गजभिये, विठ्ठल विश्वनाथ लांडगे, हरिचंद्र शिंदे, सौ. सावित्री शिंदे, शोताबाई धोत्रे, इंदुबाई वाव्हाळ, प्रिया शिंदे, सुरेश भिसे, ब्रम्हानंद जाधव, गौतम तायडे, सागर ओरसे, अशोक जावळे, मोहन गायकवाड, प्रसाद गायसमुद्रे, संजय भोसले, ॲड. रमेश सरोदे, रुक्मीनी पंडीत, निता जोगदंड, वनारसी जाधव, भीमशक्ती आयु. सुरज गायकवाड व आयु. युवराज भास्कर तिकटे, कलाबाई, गुंजाळ, युवराज मस्के, सौ. मालनताई सिरसट, सागर सिरसट, अनिता गुंजाळ, सौ. शिला बनसोडे (विजय नगर काळेवाडी), संघमित्रा सोनतळे, विजय ओव्हाळ पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस अध्यक्ष ( अनु . जाती) विभाग, संतराज आखडे तसेच सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!