देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन…

पिंपरी-चिंचवड दि.१२ डिसेंबर २०२३ देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये हजारो क्रांतिकारकांचा, त्यांच्या बलिदानांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे क्रांतीची बीजे अधिक खोलवर रूजली गेली आणि स्वातंत्र्यसैनिकांना, देशभक्तांना देश स्वतंत्र करण्यासाठी प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
क्रांतिकारक बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बाबू गेनू यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन प्रसंगी उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश मालावरील बहिष्कारच्या चळवळीत अनेक देशभक्तांनी सहभाग घेऊन विदेशी मालावर बहिष्कार टाकला होता, मुंबई येथून १२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी माल विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रकला क्रांतिकारक बाबू गेनू यांनी प्रतिबंध केला असता तो ट्रक अंगावरून गेल्यामुळे ते शहीद झाले. वयाची जेमतेम २१ वर्षे ओलांडलेल्या शहीद बाबू गेनू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळूंगे पडवळ या गावी झाला होता. लहानपणापासून देशभक्तीची आवड असलेल्या बाबू गेनू यांच्यावर लाला लजपतराय, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांच्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!