अखिल मराठी पत्रकार संस्था सालाबादाप्रमाणे याही वर्षी देणार ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पूरस्कार- बापूसाहेब गोरे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जानेवारी २०२४ अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा मानाचा ” उत्कृष्ट पत्रकारिता ” हा पुरस्कार पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ पत्रकार एमपीसीचे संचालक श्री. विवेक इनामदार यांना जाहीर झाला असून रोख रक्कम रुपये ५१,००० /- शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नितिन यादव, वाल्मिक कुटे, एम. ए. हुसेन व माधव पाटील यांना ही पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शहरातील एका पत्रकाराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२.०० वाजता काळेवाडी येथील हॉटेल ॲम्बीयन्स याठिकाणी संपन्न होत आहे.
दैनिक प्रभातचे माजी संपादक व प्रसिद्ध राजकीय समीक्षक अरुण खोरे, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, अश्विनीताई जगताप, अण्णा बनसोडे, उमाताई खापरे, माजी महापौर उषाताई ढोरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गट) पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) शहराध्यक्ष तुषार कामठे, आय. काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले,आम आदमी पार्टी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व शिवसेना मावळ लोकसभा संघटक (उद्धव ठाकरे गट) श्री.संजोग वाघेरे पाटील हे आहेत. पुरस्कार सोहळा ठीक १२ सुरू होत असून त्याच दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी ” आजचा डिजिटल मीडिया ” याविषयाची महत्वपूर्ण माहिती डिजिटल मीडियाचे पुण्यातील तज्ञ श्री. विश्वनाथ गरुड हे देणार आहेत.
सामाजिक व राजकीय पुरस्कारामध्यें १) नितीन यादव (प्रशासन भूषण पुरस्कार), २) वाल्मिक कुटे (समाज सेवा पुरस्कार),३) एम ए हुसेन (रुग्ण सेवा पुरस्कार), ४) माधव पाटील (पर्यावरण प्रेमी पुरस्कार) यांचा समावेश असून संसद महा ‘ रत्न ‘ पुरस्कार प्राप्त व संसदचे सर्वोच्च पद पिठासीन अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेले मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.बापुसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव व डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरूकामारे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.



