गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

चैन स्नेचिंग करुन फरार झालेला आरोपीला अवघ्या २ तासात मुद्देमासह केले जेरबंद चिखली पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०६ जानेवारी २०२४ काल दि. ०५/०१/२०२४ रोजी दुपारी १.३० वा.चे सुमा. एक वयोवृध्द महिला ही शंकेश्वर कॅपिटल बिल्डींगचे चालु असलेले बांधकाम समोरुन जाधववाडी चिखली पुणे येथुन फुटपाथवरुन पायीपायी घरी जात असतांना तिचे पाठीमागुन एक हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला व तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी इसमाने येवुन त्यांचे गळयातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओढुन पांढ-या रंगाच्या दुचाकी गाडीवर बसुन पळुन गेला त्यावेळी सदरबाबत चिखली पोलीस ठाणे गु.रजि.नं. ११/२०२४ भादवि कलम ३९२ या अन्वये नोंद करुन चिखली पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, यांचे मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनकडील उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट १ कडील सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर असे दोन पोलीस पथक तयार करुन चैन स्नेचिंग गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी घटनास्थळाचे आजु बाजुचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज चेक करुन आरोपीचे फुटेज प्राप्त करुन सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे परिसरातील लोकांकडे प्रसारित करुन त्या आधारे आरोपीचा माग काढत असताना सदर फुटेज मधील इसम हा विनोद सिताराम जाधव, वय – ३४ वर्ष, रा. वंदना जाधव यांचे रुममध्ये जाधववाडी चिखली पुणे मुळगांव रा. तिवसाळा, ता. घाटनजी, जि. यवतमाळ हा असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याचा लागलीच शोध घेवुन त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली असुन त्याचे कडुन दाखल गुन्हयातील १,०८,०००/- रु. कि. ची सोन्याची पोत हस्तगत करुन चिखली पोलीस ठाणेकडील गु.र.रजि. ११/२०२४ भादवि कलम ३९२ हा दोन तासाचे आत मध्ये गुन्हा उघड केला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त साो. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, पोलीस उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे, नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट १ कडील सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button