
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेने वाकड येथील एका बिल्डरला दिलेला टीडीआर पुढे ढकलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. अजित पवार यांनी टीडीआर वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या शंकेला दुजोरा देत तो तात्काळ रद्द करावा, असे सांगितले. याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे ही त्यांनी सांगीतले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे सचिव अशिम गुप्ता यांना देण्यात आले आहेत. अजित पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.
उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका अधिकाऱ्यांना शंकेच्या पिजर्यात उभे केले ते म्हणाले की, अधिकारी प्रशासक राज असल्याने ते मनमानी कारभार करत आहेत. नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, विधी सल्लागार चंद्रकांत.
इंदलकर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून
खाजगी बिल्डरला भारी TDR पेमेंट केले. खासगी सल्लागाराच्या सांगण्यावरून पिंपरी-चिंचवड पालिकेने कोट्यवधी रुपयांचा टीडीआर एका खासगी बिल्डरला भरला होता. या टीडीआर प्रकरणात १५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता.



