गुटखा, सुगंधित तंबाखू, अवैध दारू व हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करून पूर्णतः बंद करा-विजय माने

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ जून २०२६ छावा स्वराज्य सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड शहरचे कार्याध्यक्ष विजय माने यांनी निवेदना द्वारे सरकारला निदर्शनास आणून दिले आहे की पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा,अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू, अवैध दारू व हातभट्टी व्यवसाय खुलेआम सुरू आहेत.
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही काही विक्रेते व टोळक्यांकडून बेकायदेशीररीत्या गुटखा विक्री केली जात आहे. यामुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये वाढ होत आहे. तसेच हातभट्टी दारू व अवैध मद्य व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
*तरी खालीलप्रमाणे तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी :*
१) महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
२) हातभट्टी दारू, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर तात्काळ छापे टाकून कारवाई करून तात्काळ ते कायम स्वरूपी नष्ट करण्यात यावी.
३) संबंधित पोलीस अधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवावी.
४) शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक परिसरात गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५) अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधितांवर देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
६) युवक व नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन संपूर्ण शहरात विशेष मोहीम राबविण्यात यावी.
आपण सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी असे छावा स्वराज्य सामाजिक संस्था,
पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष विजय माने यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला सांगीतले. यावेळी छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे आशिष पवार, सौरभ सगर, प्रतिक पडवळ, शरद पोते, शैलेंद्र पडवळ, अतुल चव्हाण, दिनेश धोत्रे, सिद्धार्थ चव्हाण, अमीत नलावडे, विजय माने, दर्शन सोनवणे, स्वप्नील वाघमारे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
,



