आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवडच्या वतिने बॅंका व इतर कार्यालयात दैनंदिन व्यवहार मराठी भाषेतूनच व्हावा म्हणून स्थानिक सर्व अस्थापनांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ एप्रिल २०२५ आय. सी. आय. सी. आय. बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ इंडिया, (पिंपरी शाखा), डी. बी. एस. बँक, (चिंचवड शाखा), आय. डी. एफ. सी. फर्स्ट बँक, (पिंपरी शाखा), आर. बी. एल. बँक, (पिंपरी शाखा), बँक ऑफ बडोदा, (पिंपरी चिंचवड शाखा),
एच. डी. एफ. सी. बँक, (पिंपरी शाखा) या सर्व बॅंकाना मनसेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतिने निवेदन देण्यात आले आहे.
यात ते म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा नुसार महाराष्ट्रातील सर्व कारखाने/अस्थापना /कार्यालये /बँका इत्यादी ठिकाणी होणारा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतूनच होणे अपेक्षित आहे . ग्राहकांशी /कर्मचारी वर्गाशी बोलताना मराठी भाषेचा वापर करणे,विविध अर्ज, निवेदने, विविध माहिती फलक आदी साठी मराठी भाषेचाच वापर होणे अपेक्षित आहे. सदर साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं प्रयत्न करीत आहे. याबाबत या अगोदर ही आपल्याला निवेदने दिली आहेत. आता तर या संदर्भात राज्य सरकारने मराठी भाषेत व्यवहार करण्या संदर्भात आदेश ही दिले आहेत, तसे नियमही केले आहेत इतकेच नाही तर मनसेच्या आग्रहानंतर मराठी भाषेचा जाणकार व्यक्ती अधिकारी म्हणून प्रत्येक आस्थापनेत /कारखान्यात असावा या संदर्भातील आदेश ही या पूर्वीच दिले आहेत.
असे असताना काही ठिकाणी मराठी भाषेला जाणूनबुजून ठरवून नाकारण्याचे काम काही नाठाळ करताना आढळून येत आहे . असे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाही, याची नोंद घेत अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना आपणे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला द्याव्यात तसेच सर्व प्रकारचे अर्ज /निवेदने ही मराठीतून उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही त्वरीत करण्यात यावी असे या निवेदनात नमूद केले आहे.
यात पूढे असेही लिहिले आहे की या संदर्भात कुचराई झाल्यास आम्ही आपल्याला मनसे स्टाईलने आपणास भेटू याची ही नोंद घ्यावी.
आज निवेदन देण्यासाठी शहराध्यक्ष सचिन चिखले, उपाध्यक्ष राजू सावळे, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अविनाश तरडे, संतोष यादव, आकाश सागरे, विक्रम भोसले, प्रदूत कांबळे, प्रज्वल गायकवाड, आकाश कांबळे, मनोज लांडगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!