प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ फेब्रूवारी २०२४ साधारण काही दिवसांन पूर्वी म्हणजे दिनांक २६/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० बा. ते १०.३० चे. सुमारास जाधववाडी चिखली पुणे येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतुन त्यांच्या संमती शिवाय पळवुन नेले होते. सदरबाबत चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ४१/२०२४ भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. संवेदनशिल प्रकरण असल्याने व.पो.नि. काटकर याच्या मार्गदर्शना खाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. उद्धव खाडे व पोलीस अंमलदार यांची एक स्वतंत्र टिम तयार करुन तपास सुरु करण्यात आला. सदरच्या पथकाने जाधववाडी, चिखली परीसरातील सर्व सिसिटिव्ही कॅमे-याची तपासणी केली असता त्यांना सदरची मुलगी एका अज्ञात इसमासोबत जात असल्याचे त्यांना दिसुन आले. त्या ईसमाचा फोटो विकसीत करुन चिखली परीसरात प्रसारीत केला असता सदरचा ईसम हा सुरोज रेजाउल शेख वय २१ वर्षे हा कुदळवाडी परीसरात चिकन सेंटरवर काम करणारा मुलगा असल्याची माहिती त्यांना मिळाली.
प्राथमिक तपासात सदरचा मुलगा हा मुर्शिदाबाद, पश्चीम बंगाल येथील मुळ रहिवाशी असल्याची माहिती मिळाल्याने प्रथमता तपास पथकाने त्यांचे मुळ गावी त्यांचे आई वडील याचा शोध घेवून तेथे तपास केला असता तो तेथेही गेलेला नसल्याची माहिती मिळत होती. आरोपी सुरोज याचा मोबाईल फोन बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. त्याच्या संपर्कातील व्यक्तीबाबत माहिती घेता शोईल शेख, हैद्राबाद यांचे तो संपर्कात असल्याचे सिडीआर वरुन दिसुन येत होते. तसेच तो नियमितपणे रुपसिंग ठाकुर या नेपाळी मुलाचे संपर्कात असल्याचे दिसुन आले. रुपसिंग ठाकुर याचे मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण केले असता तो चंदिगड ते सिमला, हिमाचल दरम्यानच्या पुर्व बाजुकडील गावामध्ये वावरत असल्याची जुजबी माहिती तांत्रीक तपासात समोर येत होती.
तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर यांनी सपोनि / खाडे, पो. ह. १८५१ अमर कांबळे व पो. ना. १८१३ सुरज सुतार असे पथक हिमाचल प्रदेश या ठिकाणी पाठविले. त्यानी दोन दिवस चंडीगड ते सिमला हिमाचल प्रदेश दरम्यानच्या पुर्व बाजुस असणा-या पहाडी भागातील खेडेगावामध्ये शोध घेत असताना त्याना भोजनगर, ता. परवानु, जिल्हा सोलन राज्य हिमाचल प्रदेश या ठिकाणी एका ठेकेदाराकडे आरोपी सुरज हा मजुरीची काम करत असल्याची माहिती मिळाली तपास पथकाने कौशल्यपुर्वक त्यास ताब्यात घेवुन त्याने फुस लावुन पळवून नेलेल्या मुलीसही त्याच्या ताब्यातुन मुक्त केले.
अश्या प्रकाराने अत्यल्प पिडीत मुलीची सुटका हिमाचल प्रदेशासारख्या पहाडी भागात जावुन करण्यात चिखली पोलीस स्टेशनच्या पोलीसांना यश आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संजय गौर, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि / श्री. उध्दव खाडे, पोना / अमर कांबळे, पोना / सुरज सुतार, पोना / कबीर पिंजारी यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.