अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पून्हा एकदा आगीचा तांडव कार्पेट, कपडा , फर्निचर, जळून खाक कुठलीही जीवित हानी नाही..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ मार्च २०२४ श्री. संजय बांगडे यांनी दुपारी ३:३५ वाजता अग्निशमन विभागास तक्रार दिली की स्टार फ्लॉवर डेकोरेटर, सर्वे नं. १६२, त्रिवेणीनगर तळवडे येथे आग लागली आहे.
वरील घटनास्थळी आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे, चिखली, प्राधिकरण, पिंपरी, भोसरी, मोशी, व थेरगाव, अग्निशमन केंद्रांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले.
घटनास्थळी स्टार फ्लॉवर डेकोरेटर या मंडप डेकोरेशन साहित्य पुरवणाऱ्या शॉपला व त्याच्या शेजारी असलेल्या एका गॅरेजला आग लागून कार्पेट, कपडा , फर्निचर, डेकोरेशन साहित्य लोखंडे अँगल, या सर्व मंडप डेकोरेशन साठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याला आग लागून मोठे नुकसान झाले, सदरची आग पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाकडून एकूण १० अग्निशमन वाहनाच्या मदतीने विझविण्यात आली. सुदैवाने सदरच्या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही, पुढील तपास सूरू आहे.
अग्निशमनाच्या वर्दीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या एकूण ५८ कर्मचारी/अधिकारी वर्गाने कार्य केले. असे अग्निशमन विभाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!