प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ एप्रिल २०२४ लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, यांनी आगामी लोकसभा निवडणुक हया भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०८ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३९ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
भोसरी पोलीस स्टेशन गु. रजि. नं ६८ / २०२४, भादंवि ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म ॲक्ट ४ (२५), महा. पो.कायदा कलम ३७ (१) १३५ सह, क्रि.लॉ. ॲमे. ॲक्ट कलम ३ व ७, या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी नामे १) आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे रा. युवराज हॉटेलचे मागे, आदर्श नगर, मोशी पुणे २) सुनिल राणोजी जावळे वय २६ वर्षे रा. युवराज हॉटेलचे मागे, आदर्श नगर, मोशी पुणे ३) रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे वय १९ वर्षे रा. आळंदी रोड, माई वडेवाले हॉटेलचे मागे, सागर कॅफे दुकानाचे जवळ, भोसरी, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १३ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
वरील टोळी प्रमुख याने त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. संदिप डोईफोडे मा. पोलीस उप-आयुक्त (परि- ०१) स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे -१) श्री. बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वपोनि श्री. नितीन फटांगरे, (भोसरी पो.स्टे) पोलीस निरीक्षक श्री. अनिल देवडे (पी. सी. बी गुन्हे शाखा), पोउपनि श्री. शेख (भोसरी पो.स्टे) तसेच अंमलदार पो. हवा. सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी. सी. बी. गुन्हे शाखा, यांच्या पथकाने केली आहे.