पोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या आस्थापनेवरील सन २०२२ – २०२३ करिता पोलीस शिपाई यांची २६२ रिक्त पदाकरीता भरती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जून २०२४ पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या आस्थापनेवरील सन २०२२ – २०२३ करिता पोलीस शिपाई यांची २६२ रिक्त पदे भरण्याकरीता भरती दि. १९/०६/२०२४ रोजी पासुन संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.
भरतीकरीता ऑनलाईन पध्दतीने एकुण १५०४२ उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
त्यानुसार सर्व उमेदवारांना Mahait (महाव्यवस्थापक) विभागामार्फत मैदानी चाचणी प्रवेश पत्र (हॉल तिकीट) देण्यात आलेले आहे. सदर भरती प्रक्रिये करीता पहिल्या दिवशी ५०० उमेदवार यांना बोलाविणेत आलेले असुन तदनंतर प्रतिदिन १२०० उमेदवार तसेच दिनांक ०५/०७/२०२४ रोजी १६२० उमेदवारांना बोलाविणेत आलेले आहे. मैदानी चाचणी व शारिरिक मोजमाप हे संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणी नगर या मैदानावर घेणेकरीता सदर ठिकाणी पिण्याचे पाण्याची सुविधा, फिरते प्रसाधन गृह, खादयपदार्थाचे स्टॉल, वैदयकिय सुविधा, रुग्णवाहिनी इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. भरती प्रक्रिये दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणुन कायदा व सुव्यवस्थेकामी एकुण ३९६ पोलीस अधिकारी / अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. भरती ठिकाणी उमेदवार यांना लवकर पोहचणे सुलभ व्हावे या करीता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वेब साईट वर ठिकाण (location) देण्यात आलेले आहे.
जर पावसामुळे एखादया दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवार यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी अणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. उमेदवारांना अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.
भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांचे माहिती करीता वेगवेगळया चाचणीचे फलक व मार्गदर्शक सुचना भरती मैदानाच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेले आहे. सदर भरती प्रक्रिया दिनांक १९/०६/२०२४ ते १०/०७/२०२४ पावेतो घेण्यात येणार असुन पिंपरी चिंचवड भागात देहू-आळदी येथील तिर्थक्षेत्र पालखी सोहळा असल्याने सदरील ठिकाणी पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचा मोठया प्रमाणात बंदोबस्त असणे आवश्यक असल्याने दिनांक २५/०६/२०२४ ते ३०/०६/२०२४ पावेतो भरती प्रक्रिया खंडित ठेवण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!