महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री. विकी पासोटे व शिवसेना उबाठाचे भोसरी शाखा प्रमुख श्री. अमोल भिसे, श्री. शिवाजी जाधव यांचा भिमशक्ती संघटनेमध्ये जाहीर प्रवेश..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ जूलै २०२४ काल भिमशक्ती युवक संघटना पिंपरी चिंचवड शहर पक्षप्रवेश कार्यक्रम निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पार पडला.
यावेळी भिमशक्ती युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री. विकी पासोटे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे भोसरी शाखा प्रमुख श्री. अमोल भिसे, श्री. शिवाजी भाऊ जाधव यांनी भिमशक्ती संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी भिमशक्ती युवक संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री.गौतमजी गायकवाड पिंपरी चिंचवड शहर सचिव सुनील ससाने, युवक भिम शक्ती पिंपरी चिंचवड शहराचे नेते श्री. परमेश्वर निसरगंध आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष श्री सुरज गायकवाड यांच्या हस्ते भिमशक्तीचे उपरणे व पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांचा संघटनेमध्ये प्रवेश करून सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!