डोंबिवलीत खंबाळपाडा येथे विषारी संर्पाच्या दंशाने दोघींचा मृत्यु..

प्रतिनीधी सतिश पाटील मुबंई दि. ०४ ऑक्टोबर २०२५ डोंबिवलीमध्ये राहणारी प्राणवी भोईर आपल्या जुळ्या बहिणीसोबत खंबाळपाडा येथे मामाकडे आली होती. दोन दिवस मामाकडे राहिल्यानंतर आई-वडिलांनी या दोघींना परत बोलावले. परंतु प्राणवीने आणखी एक दिवस राहण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी तिला राहू दिले. श्रुती मावशीजवळ झोपलेल्या प्राणवीला पहाटे पाच वाजताच्या सुमारास मण्यार प्रजातीच्या विषारी सापाने दंश केला. यामुळे ती जोरात ओरडली. मात्र, ती झोपेत ओरडली असावी, असे वाटून मावशीने तिने आतल्या खोलीत नेऊन झोपवले.
प्राणवीला ठेवून परत आल्यानंतर तिला अंथरुणात साप दिसला. हाच साप प्राणवीला चावल्याचे मावशीच्या लक्षात येताच, घरच्यांनी तिला तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत मात्र विष शरीरात पसरून प्राणवीने अखेरचा श्वास घेतला. मावशीवर ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला आहे. बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. मात्र रात्री उशिरा तिचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या २३ वर्षांची तरुणी आणि तिची ०३ वर्षांची भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरानंतर श्रुतीचं लग्न होणार होतं. अनुवाद आपला न्युजच्या माध्यमातून विनंती कृपया आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.



