महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बनवायची होती स्मार्ट सिटी बनली बकाल सिटी बारा कोटीचा रस्ता बारा मिनिटात खड्यात बदलला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगस्ट २०२४ मोशी येथे रस्त्यावर पडलेल्याखड्यात बसून आंदोलन. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक संतापलेले पाहायला मिळाले. घरांचा टॅक्स वसूल करण्यासाठी नोटिसांच्या माध्यमातून दादागिरी करतात मात्र विकास कामाची वेळ आली की त्यावेळी मनपा अधिकारी मूकबधिर होतात असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करा अशी ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. १२ कोटी रुपये खर्च करून देखील रस्त्यावर खड्डे पडले १२ कोटीचे काम १२ लाख रुपयांत आटोपले का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी जाणून बुजून मोशी परिसराकडे दुर्लक्ष करत असल्याचे शिवसेनेच्या नेत्या रूपाली आल्हाट म्हणाल्या,
सत्तारूढ पार्टी व महानगरपालिकेचे कोणी ही इकडे फिरकले देखील नाही असे उपस्थित नागरीक बोलत होते. यावेळी या परिसरातिल सर्व नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!