पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस पक्षातील जेष्ठांना पदांचे वाटप करण्यात आले.

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ ऑक्टोंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहर( जिल्हा ) काँग्रेस कमिटीच्या पक्षातील जेष्ठ पदाधिकारी यांना समारंभपूर्वक पदांचे वाटप करण्यात आले.
मान्यवर कामगार नेते, काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे शुभहस्ते पद वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी मान्यवर (भीमरत्न) प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक/ अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना (महा. राज्य) यांना काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष डॉ. श्री. कैलास कदम यांचे शुभहस्ते पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस झोपडपट्टी सेलच्या अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
मान्यवर लक्ष्मण रुपनर यांना पिंपरी चिंचवड शहराच्या जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या व्यापारी संघटनेचे काम पहाण्यासाठी अध्यक्ष म्हणून मान्यवर अमरजित सिंह पोथीवाल यांची तर पिंपरी चिंचवड कार्यकरणीवर मान्यवर देवदत्त पोखरकर यांना सचिव म्हणून नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे माजी पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्यवर अशोक मोरे, काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड वरिष्ठ उपाध्यक्ष मान्यवर नरेंद्रजी बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष मान्यवर भरत वाल्हेकर , पिंपरी विधानसभा अध्यक्ष मान्यवर विश्वनाथ जगताप, काँग्रेस पक्षाचे सेवादल अध्यक्ष मान्यवर वीरेंद्र गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराचे काँग्रेस पक्षाचे रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष मान्यवर विशाल सरोदे, काँगेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मान्यवर
विजय ओव्हाळ, इरफान शेख, सचिन कदम, गोरक्षनाथ विकार, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे सचिव मान्यवर लक्ष्मण सिरसाट, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मान्यवर अशोक जावळे ,
सदस्य दिलीप बनसोडे, आणि तुकाराम गव्हाणे आदी मान्यवर व पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते.





