उत्सवनिवडनूकपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

प्रभाग ८ (क ) सौ. सरिता कुऱ्हाडे या शिक्षित उमेदवार..!करतील बालाजीनगर सह प्रभाग ८ चा उद्धार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ डिसेंबर २०२५ काल प्रभाग ८ येथे सर्वसाधारण महिला (क) गटातील उमेदवार सौ. सरिताताई योगेश कुऱ्हाडे (गोरडे ) यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत सरिताताईनंच्या कार्यकर्त्यां पेक्षा सर्व सामान्य जनता उस्फुर्ततेने सहभागी झालेली दिसत होती.
यावेळी रॅली पाहणाऱ्याना आमच्या प्रतिनिधीने विचारले इतका जनसमुदाय ताईंच्या सोबत कशा करिता दिसतोय तर उत्तर आले हे पैसे देऊन आणलेली जनता नाही. तर ही बदल हवा असलेली जनता आहे. यंदा बदल होणारच नेहमी बाहेरील उमेदवाराला आम्ही निवडून आणतो पण त्याचा फायदा आम्हाला होत नाही. करण त्याला आमच्या अडचणी समजत नाही. कारण तो आमच्यातला नसतो किंवा तो शिक्षित ही नसतो पण यावेळी ताईच्या रूपाने आम्हाला आमच्यातला व शिक्षित असा उमेदवार भेटला. ताई जिंकणार ही काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे.
पुढे ते बोलले कि उमेदवारांचे सासरे श्री. शंकरशेठ कुऱ्हाडे हे गेले ३० ते ३५ वर्षे या भागात सामाजिक कार्य करतात. त्यांचा मुलगा देखील या सामाजकार्यात सहभागी असतात त्यांची सुनबाई सरिताताई योगेश कुऱ्हाडे यांनी देखील या या सामाजकार्यात स्वतःला झोकून दिलेले आहे.
ताई बीए. डीएड. झालेल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर काल झालेल्या भव्य रॅलीला प्रभाग क्रमांक आठ मधून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा लाभला. या रॅलीला खासकरून प्रभाग क्रमांक आठ मधील बालाजीनगर येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील सर्व नागरिकांनी सरिताताई कुऱ्हाडे यांनाच निवडून देण्याचा ठरवले असल्याचे स्थानिकानमधून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!