विशेषशहरसामाजिक

नवी सांगवी येथील कृष्णा चौक व काटेपुरम चौक येथे वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार – मेघराज लोखंडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जून २०२५ नवी सांगवी येथे कृष्णा चौक व काटेपुरम चौक हे दोन प्रमुख वाहतूकीचे मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना व त्या मार्गावरून ये जा करणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागतो.
या ठिकाणी सिग्नल असूनही काही लोक सिग्नलचे पालन करत नाही तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या राहतात समोरून सिग्नल सुटल्यास येणाऱ्या गाड्यांना जाण्यासाठी जागा नसते त्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम होतो अशात त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मेघराज लोखंडे अध्यक्ष चिंचवड विधानसभा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रपवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांना निवेदन देत सदर विषयाची माहिती देऊन व उपायुक्तांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी दोन्ही चौकामध्ये सायंकाळी ०६:०० नंतर वाहतूक नियमनाकरिता पोलीस कर्मचारी नेमण्यात यावा अशी देखील विनंती मेघराज लोखंडे यांनी केली.
या वेळी गौरव जगताप, चैतन्य जाधव, आशिष, जॉय व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!