देश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छासामाजिक

शहापूर शिरगांव येथिल सुजाता मडके (शास्त्रज्ञ ) हिची इस्त्रोच्यावाटेवर उंचच उंच भरारी!

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. ०७ जून २०२५ यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला सरळ मार्गानेच यश मिळवता येते. त्यासाठी खूप जास्त मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करावा लागतो. असंच काहीसं शहापुरच्या सुजाताने केलं आहे. तिने मोठी झेप घेतली आहे. तिने इस्त्रोत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळवली आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील (शिरगांव) या लहानशा गावातील सुजाताची ही गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरली आहे. सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. अभिनंदन सुजाता आपण देशाचे, गावाचे, आईवडीलांचे ही नाव मोठे केलेत आपली उंच भरारी आणखीन उंचीवर जावो आपणास सर्व स्थरांतून खूप सार्‍या शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!