आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्तझाडं अभियानाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या ट्री ॲम्बुलन्सचे उद्घाटन..

प्रतिनिधी पूणे दि. ०९ जानेवारी २०२५ गेल्या सात वर्षात अंघोळीची गोळी संस्थेने इतर संस्थांच्या मदतीने हजारो झाडांचे लाखो खिळे काढले. तसेच संस्था झाडांना अळी करण्यासाठी ही पुढाकार घेत होती.
सातत्यपूर्व प्रयत्नांमुळेच आणि पाठपुराव्यामुळेच महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्बुलन्स सत्यात उतरली. त्या ट्री ॲम्बुलन्सचे उद्घाटन पाच जूनला, जागतिक पर्यावरण दिवशी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील आणि त्यांच्या टीमला विशेष आमंत्रित केले होते. उद्घाटन झाल्यानंतर माधव पाटील यांनी खिळेमुक्तझाडं या अभियानाविषयी सर्वांना माहिती दिली.
या ट्री ॲम्बुलन्सच्या साह्याने झाडांचे खिळे काढणे, झाडांना आळी करणे, वाळवी लागलेल्या झाडांना औषध पाणी करणे तसेच झाडांवर उंचावर लटकवलेले बोर्ड आणि बॅनर काढणे यासाठी होणार आहे. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आयुता रांगोळे, संदीप रांगोळे आदी उपस्थित होते.
जशी माणसांची मलमपट्टी होते तशी आता झाडांचीही मलमपट्टी होणार. पाच जून हा दिवस झाडांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!