आंदोलनआरोग्यपाणीबानीपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहरात महानगर पालिकेचे गोड पाणी अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाने झाले बेचव..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२५ वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सालारभाई शेख पिंपरी चिंचवड शहर यांनी निदर्शित केले की पिंपरी चिंचवड शहरातील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका व आरोग्य अधिकारी यांचे जनतेच्या प्रती दुर्लक्ष होत आहे असे दिसून येते. मोशी, भोसरी, नेहरूनगर, घरकुल, कृष्णा नगर आशा ठीक ठिकाणी पाण्या मध्ये जी पहिल्या सारखी गोडी होती ते पाणी आता बेचव झाले असल्याचे निवेदनातून पालिकेला निदर्शनास आणून दिले आहे. पाण्यातील गोडपणा संपला असून हे पाणी पिण्या योग्य राहिलेले नाही. हे पाणी रोगराईला आमंत्रित करत आहे, लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, आरोग्य अधिकारी व पाणी पुरवठा विभाग हे जनतेच्या जीवाशी खेळत आहे. गेल्या २०, २५ दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, नागरिकांना गढूळ, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास हानीकारक पाणीपुरवठा होत असून पाण्यात माती, कचरा व इतर अपद्रव्य आढळून येत आहे, त्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी, घस्यात खस खस करणें व थंडीताप  इत्यादी सारखे  आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून  होणाऱ्या आरोग्याची उपाय योजनांचे निवारण करण्या बाबत पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
०१) पाणी शुद्ध करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करणे.
०२) जलपुरवठा विभागामार्फत पाण्याच्या गुणवत्तेची तात्काळ तपासणी करणे.
०३) भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी देखभाल व उपाययोजना प्रभावीपणे राबविणे.
“नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील,” असा इशारा देण्यात येत आहे. निवेदन अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आले.
यावेळी वेल्फेअर पार्टी अध्यक्ष सालारभाई  शेख, इमाम नदाफ, मौलाना एहसान, खाजा नदाफ, महेबूब शेख, जुबेर खान, इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!