अ, ब, व क वर्ग प्रमाणे महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारने दिले आदेश..

पिंपरी-चिंचवड दि. १२ जून २०२५ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीस गती मिळाली असून, चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार प्रभागनियोजनाचे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (PCMC Election) चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे प्रशासनाने प्रभागरचनेच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्यात अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश केला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागारचनेनुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका -नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्ग महापालिका – तीन ते पाच सदस्य



