आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

थेरगाव आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय करा- युवराज दाखले.

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. १२ जून २०२५ सकल मातंग समाज चिंचवड विधानसभेच्या वतीने ‘ग’ प्रभाग थेरगाव या ठिकाणी आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक असं नामकरण सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले होते.
अतिक्रमण विभागाने तो नामफलक काढल्याने समाज बांधव आक्रमक झाले, पोलिस प्रशासनाच्या विनंतीने समाज शांत झाल्याचे समजते.
दरम्यान ‘ग’ प्रभाग कार्यालयावर शेकडो प्रमुख पदाधिकारी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय तयार करण्यासाठी व आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक कायम स्वरूपी ठेवण्यासाठी निवेदन ‘ग’ प्रभाग अधिकारी किशोर ननावरे यांना दिले.
या प्रसंगी ग प्रभाग अधिकारी किशोर ननावरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व मागण्यांची पूर्तता करतो असा शब्द ही दिला‌.
यावेळी सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, नगरसेविका मनिषाताई पवार, अनिताताई जावळे, तसेच शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, ऋषिकेश वाघमारे, देवा कसबे, प्रशांत वाघमारे, तुकाराम महाराज शिंदे, स्वत्निल कसबे, साई जाधव, अनिकेत मगर, राहुल गायकवाड, अजय पारखे, खंडु तेलंगे, दादा झेंडे, मयूर लोखंडे राहुल गायकवाड, अभिषेक गायकवाड, महादेव कसबे, किरण बसवंते, रोहित गरड, सुशांत लोखंडे, साई जाधव, रोहन माने, मुन्ना वैरागर, अजय गायकवाड, साहिल जाधव, सुरज सोनकांबळे, मंगेश रूपटक्के, विक्रम गायकवाड, अजय पारखे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!