
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ जानेवारी २०२४ आपल्या देशात संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवसेनेने पक्षाच्या संविधानात २०१८ मध्ये बदल केले. परंतु ती घटना निवडणूक आयोगाकडे न दिल्याने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी १९९९ ची घटना ग्राह्य धरून निकाल दिला.
विधानसभेच्या अध्यक्ष यांना शिवसेनेचे मूळ संविधान मान्य आहे पण मूळ नेते मान्य नाही.
आपल्या देशात लोकशाही टिकवायची असेल आणि संविधान वाचवायचे असेल तर भाजपच्या हुकूमशाही, विरोधी पक्षांना फोडण्याच्या प्रवृत्तीचा पराभव करणे अतिशय महत्वाचे झाले आहे.
आरोपी न्यायधीशीच्या भूमिकेत बसल्यावर न्यायाची कशी काय अपेक्षा ठेवणार आणि लोकशाहीचा अंत्यसंस्कार या निकालामधून पाहायला मिळाला अशी माहिती आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री. चेतन बेंद्रे यांनी दिली.
घटनेची पायमल्ली आम्हाला मान्य नाही विधान सभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.



