
प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १७ ऑगस्ट २०२५ सालाबादा प्रमाणे मुलुंड मध्ये एक स्वातंत्र्यदिन १४ आॉगस्ट रात्री १२वाजता अनेक वर्ष साजरा करण्यात येतो. आयोजक राजेश चव्हाण मनसे आणि सर्व टिम यांची अथक मेहनतून यंदाचा इंडीया गेट असा देखावा तयार करण्यात आला होता. त्यावेळी ‘गवणीचा गोविंदा’ पथक सलामी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संधेला जणू जत्रोत्सोवच साजरा झाला होता. यावेळी मुलुंड मधील सर्व राजकीय पक्ष व नागरिक एकत्र येत असतात. मुलुंड पोलीस ठाण्यातून अधिकारी वर्ग उपस्थित असतात. मेहूल सर्कल मुलुंड( प.) या ठिकाणी मान्यवरांकडून ध्वजारोहण करत सलामी देण्यात येते. प्रत्येक वर्षी नव नविन देखावा करण्यात येतो तो देखावा चालू घडामोडींवर प्रकाश टाकणारा असतो. असे आयोजकांनी यावेळी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगीतले.



