
प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुंबई दि. ०९ जूलै २०२५
काल झालेल्या मराठी भाषिक मोर्चात अनेक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी एकीकरण संघटना,मुंबई सह महाराष्ट्र वाचवा समिती, महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अनेक मराठी भाषिक मोर्चात मोठ्या संख्येत उपस्थित होते .
मीरा रोडमध्ये मराठी मोर्चेकऱ्यांची धरपकड, पोलिसांकडून मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न बिगर मराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात काल मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू केली होती. कोणत्याही परिस्थिती मोर्चाला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असल्याचे दिसत होते. पोलिसांकडून दिसेल त्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात आले होते. या प्रकारामुळे मीरा रोडमधील ओम शांती परिसरात मोठा गोंधळ उडाला.
मराठी भाषेच्या हक्कांसाठी मीरा रोड येथे काल (मंगळवार) मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्च्याआधीच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी काल पहाटे ३.३० वाजता त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय मनसे आणि इतर मराठी संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात झाली केली. बिगर मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यावेळी पोलीस कुठे गेले होते, असा सवाल यावेळी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मोर्चा निघण्यापूर्वीच वसईतील मनसेचे जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील यासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास ताब्यात घेतले होते.
तरी देखील मिराभाईंदर भाषावाद विरोधात मराठी भाषिक मोर्चा यशस्वी झाला.



